या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

Saturday, 26 January 2013

नाव तुझेच घेईन

डोळ्यात प्राण आणून
वाट तुझीच पाहीन
शेवटच्या श्वासातून
नाव तुझेच घेईन

तू म्हणाला होतास न
सुरेख तुझे नयन
त्यात ठेव साठवून
अवघे माझे जीवन
तुझे सुरेल कवन
आठवून रे देईन
शेवटच्या श्वासातून
नाव तुझेच घेईन

गेलास राजा निघून
प्राणप्रियेला सोडून
यशोदेचा तू मोहन
न तू राधेचे जीवन
विसरलेले वचन
आठवून रे देईन
शेवटच्या श्वासातून
नाव तुझेच घेईन

गेली कळी कोमेजून
रिते मन तुजविन
अश्रुही गेले सुकून
प्रीत अपुली पाहून
नाचलेले तुझे मन
आठवून रे देईन
शेवटच्या श्वासातून
नाव तुझेच घेईन

नाही जाणार हरून
प्रेमाला तुझ्या स्मरून
म्हणशील तू फिरून
डोळ्यात तुझ्या पाहीन
साथ तुलाच देईन
प्रेम तुझे स्वीकारून
घरी तुलाच नेईन
नाव तुझेच घेईन !


Wednesday, 9 January 2013

मर्म हे का जीवनाचे

मनी ओथंबती घन
दु:ख अन नैराश्याचे
सुटे डोळ्यांना पाझर
मर्म हे का जीवनाचे !

उर फुटला तरीही
ओढी चाक संसाराचे
याची जान ना कुणाही
मर्म  हे का जीवनाचे !

दु:ख दाबी काळजात
सुख देखी दुसऱ्याचे
पग चाले अविरत
मर्म हे का जीवनाचे !

आस उद्याची ठेवून
तुगा आज जगायचे
गेली पितरे सांगून
मर्म हे का जीवनाचे !

वेध मनाला लागती
कायमच्या सुटकेचे
कर्मकाया हि खंगती
मर्म हे का जीवनाचे !

Monday, 7 January 2013

तुझी प्रीत

तुझी प्रीत झेलीत आयुष्य माझे सरावे
तुझी सौभाग्य लेणी लेवून मरण यावे

तुझ्या श्वासाने सर्वांग माझे गंधित व्हावे
तुझ्या करस्पर्शाने रोज मोहरून जावे
तुझी प्रीत ...

तुझे खट्याळ मधुशब्द मनी साठवावे
तुझे नजरेचे खेळ लाजून आठवावे
तुझी प्रीत ...

तुझ्या प्रियजनांनी आधी मज बोलवावे
तुझ्या हाकेआधी मी काय हो हवे म्हणावे
तुझी प्रीत ...

Thursday, 3 January 2013

तुझ्या आठवाणे

जुई मोगऱ्याच्या
मंद सुवासाने
मनी प्रीत जागे
तुझ्या आठवाणे

थंडीत थिजल्या
दाटल्या धुक्याने
मनी प्रेम जागे
तुझ्या आठवाणे

 अंधार रातीच्या
शुभ्र काजव्याने
मनी आस जागे
तुझ्या आठवाणे

रिक्त वाटेवरी
तुझ्या पावलाने
मनी स्वप्न जागे
तुझ्या आठवाणे

पानातदडल्या 
पक्ष्याच्यास्वराने 
मना वेड लागे 
तुझ्या आठवाणे 

 नभी पौर्णिमेच्या
शशी दर्शनाने
मनी प्रीत जागे
तुझ्या आठवाणे !
तुझ्या आठवाणे !
                                                                                                                                                                                                                                                                                                                                      

तुजवीण

सुरेखसे हसे
ओठावर दिसे
परी काळीज तरसे
तुजवीण

दिव्यांची आरास
घरात प्रकाश
भरे मनात तमस
तुजवीण

बागडते मुल
उमलते फुल
दारी भासते चाहूल
तुजवीण

घाईची सकाळ
येई सांजवेळ
गाली अश्रूंचा ओघळ
तुजवीण

भरला संसार
भला परिवार
गच्च डोळ्यांची पाखरं
तुजवीण !