या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

Saturday, 26 January 2013

नाव तुझेच घेईन

















डोळ्यात प्राण आणून
वाट तुझीच पाहीन
शेवटच्या श्वासातून
नाव तुझेच घेईन

तू म्हणाला होतास न
सुरेख तुझे नयन
त्यात ठेव साठवून
अवघे माझे जीवन
तुझे सुरेल कवन
आठवून रे देईन
शेवटच्या श्वासातून
नाव तुझेच घेईन

गेलास राजा निघून
प्राणप्रियेला सोडून
यशोदेचा तू मोहन
न तू राधेचे जीवन
विसरलेले वचन
आठवून रे देईन
शेवटच्या श्वासातून
नाव तुझेच घेईन

गेली कळी कोमेजून
रिते मन तुजविन
अश्रुही गेले सुकून
प्रीत अपुली पाहून
नाचलेले तुझे मन
आठवून रे देईन
शेवटच्या श्वासातून
नाव तुझेच घेईन

नाही जाणार हरून
प्रेमाला तुझ्या स्मरून
म्हणशील तू फिरून
डोळ्यात तुझ्या पाहीन
साथ तुलाच देईन
प्रेम तुझे स्वीकारून
घरी तुलाच नेईन
नाव तुझेच घेईन !


1 comment:

varsha said...

khup chan kavita aahe gitanjali