मलाही एक खांदा हवा
अश्रूंनी
भिजवण्यासाठी
मरगळलेल्या मनाला
परत रिझवण्यासाठी...
धुत्कारल्या माझ्या
जीवाला
विस्कटलेल्या या
बटेला
विखुरलेल्या त्या
माळेला
परत सजवण्यासाठी
मलाही एक खांदा हवा
अश्रूंनी
भिजवण्यासाठी...
दु:खाला देण्या एक
स्वल्प
उद्याच्या सुखाचे
संकल्प
स्वप्नांचे रेखीव
शिल्प
परत बनवण्यासाठी
मलाही एक खांदा हवा
अश्रूंनी
भिजवण्यासाठी...
सृष्टीने दिलेलं
औदार्य
अस्ताला निघालेला सूर्य
सोडून चाललेले धैर्य
मनी एकवटण्यासाठी
मलाही एक खांदा हवा
अश्रूंनी भिजवण्यासाठी
...
3 comments:
Mast !!!
दु:खाला देण्या एक स्वल्प
उद्याच्या सुखाचे संकल्प
स्वप्नांचे रेखीव शिल्प
परत बनवण्यासाठी
मलाही एक खांदा हवा
अश्रूंनी भिजवण्यासाठी.......
छान ओळी..
धन्यवाद वंदू
धन्यवाद जगदीशजी
Post a Comment