आदरणीय सुवर्णसंध्याजी ,
गेले अनेक दिवस तुमच्याबद्दल लिहिणे मनात होते . पण आजच्या तुमच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लिहिण्यासारखा सुवर्णयोग नक्कीच कुठला नसेल ! मला तो दिवस आजही जसाच्या तसा आठवतो जेंव्हा तुम्ही माझ्या संवेदनशील असण्यावर दिलेली प्रतिक्रिया आणि माझ्या लेखनाचे केलेले कौतुक .. पुन्हा तेच सांगण्यासाठी केलेला फोन .. आज साऱ्यांनी तुमच्याबद्दल कौतुकाने लिहिले आहे ..आणि सारे किती सत्य आणि मनापासून नव्हे मनाच्या आतून लिहिलेय जागरकरांनी हे सांगणे न लगे .. तुम्ही आहातच तशा ! प्रत्येकजण जो तुम्हाला भेटेल त्याच्या मनात तुमच्याबद्दल नकळत आदरमिश्रितकौतुक उभे रहाते आणि खोलवर बिंबले जाते .. कायमचे ! मी आज इथे तुमचे माझ्या आयुष्यातील स्थान सांगणार आहे कारण तुमचे अनेक पैलू आहेत जे उलगडणे एका लेखात नक्कीच शक्य नाही .
मी काही पहिल्यापासून लिहिणारी नाही किंवा आयुष्यातील इतर धावपळीला बाजूला ठेवून पूर्ण झोकून साहित्याचा व्यासंग करणारी कुणी विदुशीही नाही . आहे एक संसारात , व्यवसायात आणि नातेवाईकांच्या गराड्यात हरवलेली एक अशी स्री जिला तिच्या घराच्या चार भिंतीबाहेरील जग अपघातेनेच कळते . या सुरक्षित आयुष्यात असे अपघात घडले आणि मी संवेदनशील होवून लिहू लागले . त्यात माधुरी आणि सुजित दादांच्या माध्यमातून तुमच्याशी परिचय झाला आणि प्रेमाचे जिव्हाळ्याचे हे नाते माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम नाते बनले .. असेही प्रत्येक नात्याला नाव हवे असे काही नाही परंतु माझ्या मनात तुम्ही गुरुस्थानी असलेली मैत्रीण आहात ! जिथे जिव्हाळ्याचे सारे बोलूही शकते आणि जिथून सतत प्रेरणादायी , मार्गदर्शक , सर्वोत्तमाच्या निर्मितीसाठी लागणारे सारे काही मला मिळते . .. माझे लेखन फक्त भावनिक पातळीवर होते , ते कसे चांगले आहे हे तुम्ही आधी सांगितलेत आणि हळुवारपणे हेही समजावलेत कि ते अभ्यासपूर्ण असायला हवे .. कळत नकळत (त्या वेळी ) तुम्ही जे मार्गदर्शन केले , जे दुवे सांगितले लिहिण्यासाठी ते वाचल्यावर माझ्या लक्षात आले मी किती कुंपणात लिहित होते ,,त्या कुंपणाबाहेर जावून .. अभ्यासूपणे लिहून .. ज्या स्रीयांची दु:खे मी सांगत आहे त्यांना न्यायही मिळवून देऊ शकते .. त्याच वेळी तुमच्याबद्दल एक न कधी लयाला जाणारी आदरभावना मनात वृद्धिंगत झाली .. मैत्रीच्या नात्याने हळुवारपणे तुम्हीं माझ्या प्रेमळ गुरुही बनलात ..
तुमच्या आयुष्यातील चढउतरांबद्दल मी सतत इतरांकडून ऐकत आले परंतु इतक्या वेळा संभाषण होवूनही तुम्ही कधीच ते बोलल्या नाहीत .. तुमची सर्व क्षेत्रातील अभ्यासू दृष्टी सतत तुमच्या बोलण्यातून मला दिसायची ..अभ्यासू दृष्टी तर सारेच जोपासतात परंतु तुम्ही कृतीतून त्याला आकार देत आहत यासारखी स्पृहणीय गोष्ट कुठलीच नसेल ..बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले !
स्वत:च्या मर्यादांना कधीच कुंपण होऊ देऊ नका , त्यांच्या बाहेरचे जग पाहण्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे ..त्या मर्यादा ओलांडून पुढे जायलाच हवे आणि त्यातूनच स्व:उत्कर्ष साधणार आहे ..तुमच्या सांगण्यातून ..तुमच्या जगण्यातून मी हे नक्कीच घेत आहे .. आजवर कुंपणात गुंतलेली मी.. खरा खुरा प्रयत्न करत आहे स्वतःसाठी जगण्याचा ..अंगीच्या कलेला जोपासण्याचा .. तत्वांना मुरड न घालता त्यांचे संगोपन करण्याचा ..विवेकबुद्धी जागृत ठेवून नवे ते आत्मसात करून विवेकवादी विचारांनी समृद्ध होत विवेकपूर्ण समाजनिर्मित्तीत स्वतःच्या लेखनातून आणि कृतीतून भर घालण्याचा ... तुमची सदैव ऋणी असले मी तुम्ही दिलेल्या जीवनदृष्टीबद्दल ........
तुमच्या आयुष्यातील या संस्मरणीय क्षणी माझ्या शुभेछ्या जरी यत्किंचित असतील तरी त्या नक्कीच माझ्या आतील आवाजाच्या आहेत .. वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेछ्या ... आपल्या सर्व आकांक्षा पूर्ण होवोत आणि त्यासाठी तुम्हाला दीर्घायुष्य लाभो हीच सदिछ्या ...
- डॉ. सौ . संध्या राम शेलार .
सुवर्णसंध्याजी विषयी आमच्या व पु जागर वर आलेल्या काही वाढदिवसाच्या शुभेछ्या इथे देत आहे .
डॉ . शिवाजी काळे -
कवी हनुमंत चांदगुडे -
डॉ . सुजित अडसूळ -
मा. सुवर्णसंध्याजी .
आज आपला वाढदिवस आहे .
आपण समाजासाठी , निसर्गासाठी , पर्यावरणासाठी जे काम करत आहात त्याला तोड नाही . येणारा प्रत्येक दिवस आपणास अखंड उर्जा देत राहो .
मराठी साहित्यात एक उत्तम समीक्षक म्हणून आपले स्थान आहे . नवोदित कवी व लेखकांना आपण सतत मार्गदर्शन करताना संदेश हि देता . त्यामुळे आपला फ्यानक्लब आपल्या प्रतिक्रियेची आतुरतेने प्रतीक्षा करतो .
घरच्या सर्व आघाड्या पेलत सर्वच प्रांतात आपण सहज वावरत असता .
आपणास दीर्घायुष्य लाभो आणि आपला प्रत्येक क्षण इतरांना जगण्याची प्रेरणा देवो . हीच शुभेछ्या ...
डॉ . शुभा लोंढे-
सुवर्णसंध्याजी
एक दिलदार सखी
माझ्या जागराची शान
काय वर्णावा तिचा महिमा
वाखाणण्याजोगा अपूर्व बाणा
कवीच्या प्रेरणाची स्वर्णकिरण
करी सदर मार्मिक विश्लेषण
समीक्षक व्याख्याती किती हे आभूषण
भरकटलेल्या समाजाची आशा
प्रत्येकाच्या सुखदु:खांची मनीषा
लाखोंची प्रेरणा अन उत्कर्षा
स्ववेदनेला तारले हरल्या निराशा
निसर्गाचे देणे त्यांनीच बहरावे
पक्ष्यांच्या विकासा धडपडावे
पोषक सुखसोईने त्यांना उभारावे
संवर्धन निसर्गाचे आदर्श जोपासावे
मायेच्या ममतेने ममतेने करी
सर्वांच्या लिखाणाचे कौतुक
शब्द शब्दात झळके विलक्षण
तेजाचे अपार प्रेम स्नेह सहेतुक
सदैव बहरावी तुझी प्रतिभा
चमकावी बुद्धी तेजाची आभा
अनंत भरारी घेवून आकाशी
मनिषा तव उदंड आयुष्य लाभो
डॉ शुभा प्रशांत लोंढे .
सुनिता -
सुवर्णसंध्याताई ,
तुमच्यासारख्या निसर्गप्रेमी व्यक्तीचा वाढदिवस श्रावणात असणे किती सुंदर योगायोग ! जगायला शिकवणाऱ्या श्रावणाने अशी तुमच्यासारखी संवेदनशील कर्तव्यदक्ष माणसे बहाल केली . आपली लेखणी सदैव बहरत राहो श्रावणातील हिरवाईसारखी ..तुम्ही आमच्या लेखणीची प्रेरणा आहात . तुम्हाला दीर्घायुष्य लाभो ..आरोग्य लाभो ..
डॉ माधुरी बोथटे -
अशा अनेक शुभेछ्या आहेत वेळेअभावी इतक्याच सांगितल्या ..

4 comments:
संध्या, छान लिहिलं आहेस.
संध्या, छान लिहिलं आहेस.
धन्यवाद सुजित दादा
मला कोणत्या शब्दांत व्यक्त व्हावे हे खरोखरच कळत नाहीये. आपल्या सगळ्यांच्या प्रेमात असच मनमूक्त होत जगता येवो. तुमचे हे ऋण जन्मभर असेच आनंदाने अभिमानाने मिरवत राहील. खूप खूप आभार सगळ्या मित्रांचे, मैत्रिणींचे, बहीण ,भावांचे संख्यांचेअन सगळ्या माझ्यावर निःस्वार्थ प्रेम वकरणाऱयांचे मनापासून आभार.
सुवर्णसंध्या
Post a Comment