या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

Saturday 26 November 2011

माझे हसू

     माहेरी जाने म्हणजे प्रत्येक सासुरवाशिणीला एक आनंद सोहळा ! पण बऱ्याचदा काही अश्या गोष्टींसाठी जावे लागते कि .... मन उदास असते ! माझे माहेर तसे साधारण ३ तासाचा रस्ता .असेच एकदा आम्ही ,मी आणि यजमान कर्जतला (जि-अहमदनगर) चाललो होतो . एका दश्क्रीयाविधीला चाललो होतो ,माझ्या मनात असंख्य आठवणी रुंजी घालत होत्या आणि मी तशी जास्त दु:खी होत होते . आम्ही दोघेच गाडीत होतो आणि साधारण सकाळी ६ ची वेळ होती .संपूर्ण रस्त्याने ते विषय बदलून बोलण्याचा प्रयत्न होते पण मी काही गतआठवणीतून बाहेर येत नव्हते .त्यांनी सर्वप्रकारे मला समजावले पण मी काही केल्या बोलत नव्हते . शेवटी त्यांनी एफ एम चालू केले ,सकाळची वेळ होती ,भक्तिगीते चालू होती .पण माझी उदाशी संपत नव्हती कारण लहानपणापासून ज्यांनी फक्त माया लावली ,संस्कार दिले त्यांचे असे अपघाती निधन मन विषण्ण करत होते .त्या नादात सिद्धटेक मागे पडले . गाडी सावकाश चालली होती ,मी माझ्या विचारात आणि तेही प्रयत्न करून गप्प बसलेले ! एका वळणावर त्यांनी गाडी फास्ट केली ,थोडे घाबरल्याचे हावभाव केले ,मी बघत होते पण काही बोलले नाहि .मग अचानक त्यांनी ब्रेक दाबले गाडी थांबली ,काच खाली करून बाहेरच्या मुलाला घाबरून (अक्टिंग) विचारले ,''काय झाले रे ?'' मीहि थोडी घाबरले मला वाटले काहीतरी अघटीत घडले ! मी आता पुरती घाबरले ! त्या मुलालाही दम लागलेला ,तो २ मीनीट धापा टाकत होता .माझी अवस्था एकदम बिकट!
 ''काही नाही''तो मुलगा बोलला .
''मग पळायला काय झाले ?''
त्या मुलाने काय ओळखायचे ते ओळखले आणि दोघे हसू लागली !मला हि गोष्ट समजायला वेळ लागला ,तोपर्यंत गाडी पुढे आली होती .मग मीही हसायला लागले ! कारण तो मुलगा रनिंग करत होता सकाळी सकाळी ! मी हसले आणि त्यांच्या प्रयत्नाला यश आले ! सुखं आणि दु :ख आयुष्यात चालूच असते ते कुणी बदलत नाही पण अश्या प्रकारे वाटून नक्की घेतात !

No comments: