शोधते आहे अस्तित्व माझे मी
घरातील चार भिन्तींच्या मध्ये
घराबाहेरील स्वच्छ अंगणामध्ये
तुळशीवृन्दावनाच्या पायामध्ये
शोधते आहे अस्तित्व माझे मी
प्रत्येक जपलेल्या नात्यामध्ये
वाढविलेल्या गोंडस फुलामध्ये
त्यांना सुखी केलेल्या क्षणांमध्ये
शोधते आहे अस्तित्व माझे मी
क्षणोक्षणी केलेल्या त्यागामध्ये
नको असताना भोगलेल्या भोगामध्ये
माझ्यावरच्या विनाकारण रागामध्ये
शोधते आहे अस्तित्व माझे मी
शब्दकोशातील स्रीच्या व्याख्येमध्ये
गहिवरलेल्या असंख्य गीतांमध्ये
ललनेवरील सौंदर्यकथांमध्ये
शोधते आहे अस्तित्व माझे मी
आहे आशा सापडेल नक्की मला मी
अरे सापडले कि, अंधारलेल्या रात्रीमध्ये
चुरगळलेल्या सुखस्वप्नफुलांच्या शय्ये मध्ये.
घरातील चार भिन्तींच्या मध्ये
घराबाहेरील स्वच्छ अंगणामध्ये
तुळशीवृन्दावनाच्या पायामध्ये
शोधते आहे अस्तित्व माझे मी
प्रत्येक जपलेल्या नात्यामध्ये
वाढविलेल्या गोंडस फुलामध्ये
त्यांना सुखी केलेल्या क्षणांमध्ये
शोधते आहे अस्तित्व माझे मी
क्षणोक्षणी केलेल्या त्यागामध्ये
नको असताना भोगलेल्या भोगामध्ये
माझ्यावरच्या विनाकारण रागामध्ये
शोधते आहे अस्तित्व माझे मी
शब्दकोशातील स्रीच्या व्याख्येमध्ये
गहिवरलेल्या असंख्य गीतांमध्ये
ललनेवरील सौंदर्यकथांमध्ये
शोधते आहे अस्तित्व माझे मी
आहे आशा सापडेल नक्की मला मी
अरे सापडले कि, अंधारलेल्या रात्रीमध्ये
चुरगळलेल्या सुखस्वप्नफुलांच्या शय्ये मध्ये.
1 comment:
khup sundar!
Post a Comment