या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

Thursday 15 December 2011

माझ्या जीवनात फक्त तू

     माझ्या स्वप्नात माझ्या मनात 
     माझ्या जीवनात फक्त तू 


     तुझ्याशिवाय अपूर्ण मी
     तुजसवे परिपूर्ण मी 
     आकाशीच्या चंद्रासारखा 
     का असा दूर तू 
     
     माझ्या स्वप्नात माझ्या मनात 
     माझ्या जीवनात फक्त तू 


     तुझ्याशिवाय सुखही नकोसे 
     तुजसवे दु:खही हासे 
     जवळ असतोस मृगजळासारखा 
     का असा दूर तू 


     माझ्या स्वप्नात माझ्या मनात 
     माझ्या जीवनात फक्त तू 


     तुझ्याशिवाय शब्दही अपुरे 
     तुजसवे मन कवितेने भरे 
     भासतोस एका आनंदी गीतासारखा 
     का असा दूर तू 


     माझ्या स्वप्नात माझ्या मनात 
     माझ्या जीवनात फक्त तू 


     तुझ्याशिवाय गुलाबही गंधहीन 
     तुजसवे हरेक फुल जाते सुगंधून 
     फुलतोस का मी झोपल्यावर रातरानिसारखा 
     का असा दूर तू 


    माझ्या स्वप्नात माझ्या मनात 
    माझ्या जीवनात फक्त तू 


    तुझ्याशिवाय जगते मी अर्थहीन 
    तुजसवे सुखावते माझे जीवन 
    वागतोस मनमौजी वाऱ्यासारखा 
    का असा दूर तू 


     माझ्या स्वप्नात माझ्या मनात 
     माझ्या जीवनात फक्त तू 


     येशील न होवून चंद्र पौर्णिमेचा 
     बरसशील न होवून पाऊस वळीवाचा 
     फूलशील न होवून कमळ कायमचा 
     राहशील न होवून प्रियकर जीवनभराचा 
     कारण 


     माझ्या स्वप्नात माझ्या मनात 
     माझ्या जीवनात फक्त तू 

3 comments:

गणेश पावले said...

mast.... khup chaan...!

सौ गीतांजली शेलार said...

धन्यवाद गणेश ! तुमच्या कविता वाचल्या छान आहेत ! मी काही कवयत्री नाही पण सुचते असे कधी ! तुमच्यासारखे माझे जीवन गावच्या मातीत वाढले आणि घडले आहे ! चांगले वाटले तुमच्याशी संवाद करून !आभारी आहे !

writetopaint said...

Now I get it. As you say, you are not a poetess but a writer who pens down thoughts as they come. This is a good effort for sure. Keep it going!