रुतणारे दगड आणि बोचणारे काटे संपतील का कधी? जीवनाशी पैजा घेत चालतेच आहे एका निवाऱ्याची आणि निवांत विसाव्याची वाट बघत ..... देवालाही साकडं घातलं दे मला प्रेमाचा पाऊस ज्यात भिजून आत्तापर्यंतच्या वेदना ,थंडाव्यासाठी आसुसलेल्या, तुझा स्पर्श होताच उडून जाऊ दे त्या रुईच्या म्हातारीसारख्या माझ्या दृष्टीपलीकडे .........पण तोही नाही बरसला ....वाटल असेल काही काम माझ्याही पेक्षा गरजेच ...कदाचित माझ्याही वरचढ असेल त्याचं दु:ख ....परत येशीलच कि .... मी वाट पाहीन ...तसंही वाट पाहून मिळालेलं सुख किती गोड असतं ते त्या चातकानी सांगितलं होत मला ! या उल्हासित आठवाणे परत व्यापून टाकल मन माझं...बारा महिने नाही त्याही पेक्षा जास्त प्रतिक्षेची तयारी केली त्याने ! त्या रसभरीत स्वप्नांनी प्राण पेरले कणा कणात ! उद्या नक्की माझ्या दारात सुखाचं झाड उगवणार होत ! स्वप्नांच्या या गरुडावर स्वार होऊन कधीच गेलं ते विश्वाच्या भ्रमनासाठी! त्याला वरून सगळ सुजल सफल दिसत होत ! थंडगार आंब्याचं झाड , रसरसलेल्या फळांनी बहरलेलं, वाटलं जावं जवळ त्याच्या ...गेले तिथं एका फांदीवर विसावलेही ...भळभळ वाहणारी जखम तिथेही होती ...विचारलं त्या आंब्याच्या झाडाला ....इतका सुखी तू रसरसलेली फळ आणि थंड हिरवी पान काय दु:ख आहे तुला ? माझ्या फळांसाठी मारतात दगड मुलं आणि करतात रक्तबंबाळ मला .. या जखमा वागवत मीही मोठा झालो ! लहान असताना वाटायचं फळ आल कि काय सुख पण आता ....कधी फळे संपतील याची वाट पाहतोय .........डोळ्यांच्या कडा पुसत उठले ! परत जागेवर आले ...आता ठरवलंय नाही वाट पाहणार सुखाची ,प्रेमाची ....जर भेटणार असेल याहीपेक्षा मोठी वेदना तर नको कोसळू पावसा ...आज उमलेलं फुल उद्या सुकनारच कि ! म्हणून जगून घेणार आहे मी आज ....आता ठरवलंय त्या दगडांना आणि काट्यांना कवेत घेऊन खेळणार आहे त्या वाऱ्याशी ! आणि झेपावणार आहे आभाळाकडे त्यालाही कधीतरी दया येईलच कि ..........
या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !
Sunday, 6 November 2011
Saturday, 5 November 2011
पिसाळलेला
धाय मोकलून रडत होती सुनिता .काय करणार कारभाऱ्याला काय बी उप्योग होणार नाही म्हनत्यात दागदर. आस कस होईल म्हणावं त्यास्नी? सकाली त चांगला व्हता पाणी गीलता नाय येत म्हणत व्हता . आस काय बाय बरलत सुनिनी आख्खा भिलवाडा गोला केला ....दिउरुसी म्हणत व्हता त्यो वड्याला गेला तवा त्या बुडून मेल्याल्या किसन्यानी त्येला झपाटला इयक कोंबड आन रोट टाकायला सांगितला त्ये बी केलं पर आज त्येस्नी पाणी बी गली उतरणा मग मालक ऐकना त्येनी गाडीवर टाकला नी दवा आणायला नेला पर आस कसं दागदर म्हनत्यात त्येचा उल्गाडा तिला होत न्हवता ती मोठ्यान रडून झुम्बरीच्या गळ्यात पडत व्हती आन कारभारी मातूर सव्ताला घरात डांबून घेऊन अंधारात जाऊन बसत व्हता . मधीच पाणी मागायचा नी कुणी गिलास फुड केला कि मोठ्यान आरडत दारामाग लपायचा.........
म्हाद्या भिल कामाला वाघ गडी, पाहिल्यापास्न एकाच मालकाकड टिकून व्हता . मालक बी त्येच्यावर सगळ काम टाकून निर्धास्त व्हता .त्येच्या या इमानापायी मागल तवा मालक पैका देयचा. सुनी आन त्येची आय , कवा पटल नाय म्हणून मोठा पोरगा भाऊ झाला आन त्येनी वायली चूल मांडली . नन्तर त्येला मनी , संत्यु आन भिंगरी झाली . सगल्या पोरास्नी त्यो सालत धाडीत व्हता . सवता मरुस्तवर काम करायचा पर पोरास्नी कवा कुणाचा बांध चढू दिला नाय त्येनी .
पंधरा दिस झालं उसाचं पाणी रातभर देऊन म्हाद्या घरी निगाला तवा कायतर पायास्नी मऊ लागलं कुई आवाज आला त्यो बी लई बारीक खाली नजर गिली त एक कुत्र्याच पिलू .. का कुणास माहित पर त्येला दया आली नी त्येनी त्ये पिलू घरी नेलं त्येस्नी भाकर टाकली ,पाणी पाजल. भिंगरी पळत आली आन पिलासंग खेळाया लागली . भाऊ ,मनी बी गोला झाली . म्हाद्यानी तवर सगळ आवरून भाकर खाल्ली आन संग भांधून बी घीतीली . बाहीर आला त सगळी पोरं त्या कुत्र्याला छळीत व्हती त्येनी पोर हाकाल्ली पिलू झापाखाली झाकून कामाला गेला . दुपारी आला त मनिनी पिलू काढाल व्हतं पिलाच तंगड धरून वढीत व्हती त्ये पिलू मातर किविलवान क्या क्या करीत व्हतं . मनी तंगड वढायची आन संत्या कान वढायचा आता पिलू गुरगुर कराया लागल आन वाचकून संत्याला चावल संत्यानी सोडलं त मनिला चावल . मनिला चावल म्हणून महादूनी धरून फेकाया लागला त त्येला बी धरलं कि ! संत्यानी एक चिपाड आणल आन कुत्र्याला माराय लागला कसं बस सुनिनी त्ये सोडावल आन झापाखाली डालल. सगळी जिकड तिकड झाली . सुनिनी सांजच्याला झापाखाली थुडी भाकर आन पाणी सरकवलं .
सकाळ्च्याला सालत जायच्या आन कामाला जायच्या घाईत कुणी कुत्र्याकड फिरकल नाय आन कालचा राग आन भ्याबी होतंच कारण पिलू बारीक व्हतं पर लचक चांगलं मोठ काढाल व्हतं! सुनीच काम आवरलं , कुत्र्याच ध्यान झालं म्हनुन्श्यान झाप काढला त कुत्र गपगार , हलून बघितलं पर त्ये काय हलणा . दुपारी महादू आला त्येला दाखिवल . महादुला त्ये बघून घाम फुटला . त्येनी काय ते वलिकल . त्याच पायी मालकच घर घाटल आन मालाकाकून पैका घितला . मनी आन संत्याल्या संग घेऊन तालुक्याचा दवाखाना गाठला . पैका कमी पडला म्हणून त्येनी संत्या आन मनिला सुई घीतली त्यो मातूर तसाच आला . आज उद्या करून त्येची सुई घियाची राउन गिली . कामाच्या नादात त्यो बी इसरून गेला .
पाच दिसापासून त्यो खायचा कमी पडला . सुईच्या भ्यापायी इलाज कराय नको म्हणायचा . मालक सवता नेतो म्हणाला पर ह्यो काय गेला नाय . सुनिनी भगत बी केला पर म्हाद्या काय उलगडणा . दार लाऊन बसाय लागला ,पाणी घिना मग मालकांनी गाडीत टाकला आन दवाखान्यात नेला . गाडीत बसला पर डोळ् खुल करून उजेड त्येन बगितला नाय . दागदरनी तपासला आन सुनीला इचारल कुत्र चावल व्हत का ? सुनी म्हणली हाव चावल व्हत कि ! दागदरनी मालकाला आत बोलून सांगितलं त्यो पिसाळलेला हाय , एक दिवस फक्त !
मालकांनी घरात आणून टाकला ,सुनीच्या हातात पैका ठीवला आन डोल्यास्नी पंच्या लाऊन निगुन गेल ...सुनी मातर आरडत व्हती , म्हाद्याला भान नव्हत ,पोर टकामका बगत हुती आन भिलवाडा वाट बगत व्हता म्हाद्या कवा मरायचा ... त्येंना माहीत व्हत ह्यो चुकून आपल्याला चावला त आपल बी काय खर नाय . एक म्हातारी उठली आन दाराला भाहीरून कडी घातली आन सुनिजवळ येऊन बसली ....

Wednesday, 2 November 2011
भारतीयाला अभिमान वाटावा अस काही
बऱ्याच दिवसानंतर एक चांगलं पुस्तक हाती लागल आहे 'किमयागार ' ! अच्युत गोडबोलेंनी पहिल्या लेखात प्राचीन भारताचे विज्ञानाला असलेले योगदानाचे वर्णन केले आहे . त्यातील काही गोष्टी माहित आहेत पण त्याचा पूर्ण इतिहास वाचताना आश्चर्य तर वाटतेच पण उस्तुकता ताणली जाते . आपल्या पूर्वजांचे हे विस्तृत ज्ञान तेही इतर जगाच्या आधी! अभिमान वाटतो .
इ.स .पूर्व १५०० या सुमारास लिहिली गेलेली 'शल्वसुत्रे' या शल्वसुत्रांमध्ये पायथागोरसचा सिद्धांत लिहिलाय , पाय ची किंमत सांगितली आहे पण कारण दिलेलं नाही . महर्षी कणाद यांनी ख्रिस्तपूर्व पाचव्या शतकात अणुविषयी तर्क केले होते . शून्याची कल्पना भारताने जगाला दिली आहे ! पाचव्या शतकातील आर्यभट्ट यांनी पृथ्वी गोल आहे ,स्वताच्या अक्षाभोवती फिरते आणि सूर्याभोवतीहि फिरते हेही जगाच्या आधी सांगितलं विशेष म्हणजे पृथ्वीचा परीघ त्यांनी गणिताने काढला (३९७३६किमी) आज तो ३९८४३किमी इतका आहे ,याच्याही पुढे जाऊन एका वर्षात ३६५ दिवस ,६ तास ,१२ मिनिटे आणि ३० सेकंद असतात हेही काढाल होतं!
याशिवाय १२ व्या शतकातील भास्कराचार्य यांचेही गणितात खूप मोठे योगदान आहे ! वैद्यकीय शाखेत आयुर्वेद तर संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेते ! वेदकाळातील विद्यापीठे ,तक्षशिला,नालंदा आणि वाराणसी !
लेखकांनी याविषयी आनंद व्यक्त केला आहे पण यानंतर आतापर्यंत खुंटलेल्या प्रगतीबद्दल खेदही व्यक्त केला आहे !

Monday, 17 October 2011
पत्रास कारण कि
//श्री//
१७/१०/२०११ सौ गीतांजली शेलार
सोमवार सांजवेळ
आदरनीय,
माझ्या बाळाचे गुरुजन ,
स. न .वि .वि . पत्रास कारण कि ,
माझ्या हृदयातील ज्या लहरींच्या प्रेरणेने हृदयाची हालचाल चालू आहे त्या लहरींचा निर्माता, माझ्या संधीकाली असणाऱ्या आयुष्याचा आधार, माझ्या मनाचा आनंद असणारा माझा बाळ मी त्याच्या पुढील जडणघडणी करता तुमच्याकडे सोपवताना माझ्या मनातील माझ्या स्वप्नांची, माझ्या अपेक्षांची जी काही यादी म्हणा हव तर ती मी तुम्हाला सांगू इच्छिते, म्हणून तुमच्या अमूल्य अशा वेळेतील काही मिनिटे माझा हा पत्रप्रपंच वाचण्यासाठी द्यावा हि नम्र विनंती!
माझ्या मनातील या ताऱ्याला, माझ्या आयुष्यातील स्वप्नांच्या या वेलीला आकाशाला गवसणी घालायची कला शिकवा !ज्यामुळे तो फक्त माझ्याच मनातील तारा न राहता समाज्यातील दीनदुबळ्या प्रत्येक घटकाच्या मनातील स्वप्नांचा वेलु बनेल ! त्याला बाराखडी शिकवताना क -कमळाचा ख -खगाचा आणि ग -गवताचा नक्की शिकवा,हे शिकवताना त्याला हा निसर्गच आपला निर्माता आहे याची अवहेलना करताना तुला तेवढच दु:ख होऊ दे जेव्हड तुला तुझ्या आई बाबाची अवहेलना होताना होईल हेही नक्की शिकवा! फुलपाखरू जसं लहान मोठ्या प्रत्येक फुलातील मधुरस प्राशन करून आपल्या पंखांवर अनेक रंग घेऊन जशी आनंदाने बागडतात तसं प्रत्येक क्षणातील लहान मोठं सुख जगायचं कसं हे शिकवा म्हणजे त्याच आयुष्य फुलपाखराच्या पंखान्प्रमाणे विविधरंगी होईल !
खळखळ वाहणारा निर्झर जसं त्याच्या शुद्ध पाण्याने काठावरील प्रत्येक सान थोराची तहान भागवण्यात धन्यता मानतो तसं यालाही प्रत्येक अबालवृद्धाची काठी होऊन सेवेच्या आणि प्रेमाच्या निर्मळ जलाने त्यांची तृषा शांत करताना निरपेक्ष भावना उरी कशी जपावी हे शिकवा ! नदी जसं डोंगराच्या कड्यावरून कोसळल्यानंतरहि तिचा प्रवाह अखंड चालू ठेवते आणि स्वताची वेदना उरी साठवून भोवताल हिरवाईच्या नवचैतन्याने नटवून पुढे चालत राहते तसं त्यालाही सांगा निराशेच्या गर्तेत गेल्यावरही स्वताच्या वेदनेच भांडवल न करता जवळच्या गरीबांच जीवन सुखाच्या हिरवळीने व्यापून टाक, स्वताचा प्रवास न थांबवता !
पाखरू जसं दिवसभर चाऱ्यासाठी हिंडून सायंकाळी घरट्याकडे झेपावते तसं तुही संपूर्ण जगातील ज्ञान मिळवण्याच्या नादात स्व:तच्या मूळ घरट्यात परतायचं असतं हे कधी विसरू नकोस! आणि तुझी ज्ञानार्जनाची भूक भागविण्यासाठी काही क्षणांसाठी दूर जाताना भांबावून जाऊ नये हेही शिकवा माझ्या पिलाला! डोंगर जसं वाऱ्यावादळात जराही विचलित न होता भक्कम राहतो तसं तुही या समाजाने निर्माण केलेल्या चक्रीवादळात हरवून न जाता बरोबरच्या आणखी चार जणांना घेऊन कसं तटस्थ रहायचं हेही नक्की शिकवा !
त्याला हे सांगा कि फणसा नारळाप्रमाणे प्रत्येक माणसाच्या मनात असतो एक हळवा गोडवा जो मिळवायचा असतो न थकता त्याचे काटे काढून व कडक करवंटी फोडून ! थकु नकोस हे करताना कारण कष्ट करून जी गोष्ट मिळवशील ती तुला फक्त सुख नाही देणार तर आत्मसुख देणार आहे ! कितीही छोटा जीव असलास तू, तरी तुझ्यासारख्यांना एकत्र घेऊन कितीही मोठं कार्य सिद्धीस नेण्याची क्षमता असते आपल्यात! हे पटवून देताना मुंग्यांच्या एकीने कसं भलमोठ वारूळ तयार होत हेही दाखवा त्याला!
त्याला शिकवा कितीही मोठा तरु बनलास समाजाच्या, दृष्टीने तरी वेलींनाअंगाखांद्यावर घेऊन त्यांनाही आकाशाजवळ नेऊन सोड त्या अशोकवृक्षाप्रमाणे !आणि त्याचवेळी तुझी मूळहि घट्ट कर जमिनीत त्या वटवृक्षाप्रमाणे! त्याला शिकवा शोधायचं असत या निसर्गाच्या कुशीत लपलेल सत्य, जे आपल जीवन संमृद्ध करण्यासाठी मार्गदर्शन करेल ! त्याला हेही सांगा आपला निर्माता असणाऱ्या निसर्गाने बनविली आहे प्रत्येक गोष्ट माणसाच्या भल्यासाठी फक्त कसं ते आपण ओळखायच असत !
माजलेल्या भल्यामोठ्या हत्तीला जसं छोटी मुंगी काबू करू शकते तसं तू कितीही लहान असलास तरी तुझी सत्याची आणि प्रेमाची ताकत अगडबंब अशा संकटालाही वेसन घालू शकते हे त्याला समजावून सांगा!
तुम्हाला मी माझा संगमरवरी दगड सुपूर्द केला आहे त्याला तुम्ही पायरीचा आकार दिलात तर मी समजेन माझा बाळ ज्ञानेश्वर बनला म्हणून नक्की तुम्हाला दुवा देईन! त्यातून तुम्ही कळस घडवला तर मी समजेन तुम्ही तुकाराम घडवला आणि तुम्हाला दुवा देईन ! आणि तुम्ही त्याची मूर्ती घडवली तर मी समजेन तुम्ही राम ,कृष्ण किंवा शिवाजी राजे घडवलेत आणि तुम्हाला दुवा देईन !
-तुमची कृपाभिलाषी
सौ गीतांजली शेलार.
Wednesday, 12 October 2011
माझी जगावेगळी प्रेमकहाणी !
आज गजर होण्याच्या आधीच जाग आली. पहाटेचे साडे चार वाजले होते, उजाडायला अजून बराच वेळ होता म्हणून या कुशीवरून त्या कुशीवर वळत होतो पण झोपेला काही माझ्या डोळ्यांचा पत्ता गवसत नव्हता! काळजी मग ती येणाऱ्या सुखद क्षणाची असो अथवा लहान मोठ्या संकटाची, मनात तितक्याच ताकतीच काहूर निर्माण करायला पुरेशी असते. रात्री बापूंचा फोन आल्यापासून मनाची हर्षित अवस्था मित्रांपासून लपता लपत नव्हती, कशी लपेल मी कधीचा मनाशीच हसत होतो, जेवतानाही मन जेवणात नव्हतच! शेवटी न राहवून विलास म्हणालाच,''आम्हाला कळेल का या आनंदचे कारण?''
''अरे काही नाही उद्या बापू आणि दादा येणार आहेत दादाला मुलगी पाहायला आम्ही जाणार आहोत.''
'' तू असा काही वागतो आहेस कि मला वाटल तुलाच मुलगी पाहायची आहे!''
'' नाही रे, आमच्या चौघांच्या घरात हे नवीन माणूस म्हणजे थोडी उस्तुकता असणारच ना ? त्यात मला बहिण नाही, म्हणून रे बाकी काही नाही!''
सगळ्यांच्या आधी उठून चहा, नाश्ता उरकून बसलो. बाल्कनीत येऊन बापू आणि दादाची वाट पाहत होतो. समोरच्या मोकळ्या मैदानात होस्टेलची मुलं क्रिकेट खेळत होती .
सुहास मला हाक मारत होता ''चल ना विकास''
''नको रे सुहास त्याची इस्री मोडेल कपड्यांची, आज वहिनी पाहायची आहे आम्हाला'' माझ्या आधी विलास उत्तरला. सगळे हसत निघून गेले . त्यांचा खेळ मी बाल्कनीतून बघत होतो..
त्यानंतर काय झालं, मी कसा घरी आलो ,दादा काय बोलला हे आठवत नाही. मी एका अशा अवस्थेत होतो कि दुसऱ्या दिवशी जरासा भानावर आलो .तोपर्यंत हे काय झालं , दादाऐवजी दुसरा कुणी असता तर भांडून,विनंती करून कसही मी तिला मिळवलच असतं पण जर दादाने होकार दिला तर? का देईल तो नकार? इतकी सुंदर, सालस मुलगी तो नको म्हणणार नाही ,आणि ती जर वहिनी म्हणून घरात आली तर मी स्वतःला संभाळू शकेल का ? बर झालं मी कुणालाही माझी हि प्रेमकहाणी सांगितली नाही. कमीत कमी मी एकटाच सहन करणारा असणार आहे..... हो पण आता माझ्या आयुष्यातील लग्न हि गोष्ट मी काढून टाकणार! तिच्याशिवाय दुसरी कुणी ....नाही विचारही मनात आणू शकत नाही ! काय करू ...माझ्या मनाची हि अवस्था कुणाला सांगू ! आईला ...नको ,कि बापूंना ...,कि विलासला ...नको बाहेरच्या माणसाला नको ..काय करू ...अस वाटत होतं डोक्याचे सगळे केस उपटून काढावेत ,भिंतीवर डोक आपटाव कि ....
दिवसभर कॉलेजला गेलो नाही ,न जेवता तसाच पांघरुन घेऊन झोपून राहिलो . मित्रांनी कमेंट केल्या पण त्या समजण्याच्या पलीकडे मी गेलो होतो,शेवटी तीही कंटाळून कॉलेजला गेली. चारच्या दरम्यान बापूंचा फोन आला, त्यांनी जे सांगितलं त्याने मला काय कराव काही कळत नव्हत. दादा नाही म्हणत होता लग्न करायला, बापू सांगत होते त्याला समजाव म्हणून! आता मी कस समजावणार होतो देव जाणे ! दादा इतक्या सुंदर मुलीला का नाही म्हणत असेल? मी काल येताना काही बरळलो तर नाही? तसं बापूनी सांगितलं असत मला, काय झालं दादाला, कुणी दुसरी? त्याने मला सांगितलं असतं, कदाचित लाजला असेल, पण आईला नक्की सांगितलं असतं ...मला आनंद होत होता पण वाईटहि वाटत होत तिला नकार कळल्यावर ती आमचा सर्वांचा तिरस्कार तर करणार नाही? एक ना अनेक शंका माझं मन पोखरत होत्या.
दुसऱ्या दिवशी कॉलेजच्या गेटमध्ये थांबायचं धाडस झालं नाही पण म्हणतात ना भित्यापाठी ब्रह्मराक्षस तसं ती माझ्या समोर आलीच! पण ती हवीशी वाटणारी एक रमणी होती , माझी? कोमल होती. पर्वाची ओळख लक्षात ठेऊन तिने एक हसरा कटाक्ष माझ्याकडे टाकला ,माझ्या शरीरात एक गोड ,हवीशी वाटणारी वेदना सरसरून अंगभर पसरली , क्षणभर कोमल मोरपीस चेहऱ्यावर फिरतोय असं भासलं ! भानावर आलो तर तिथ कुणीच नव्हत..मनाचं हे सुख क्षणभर राहील! वाटल तिला उद्या नकार कळला तर काय होईल ? देवाला माझी दया कधी येईल का ? तसाच परत होस्टेलला आलो . आपण कितीही अस्वथ असलो तरी जगापासून मनाची हि होरपळ लपवाविशीच वाटते, डोक्यावर पांघरून घेतलं कि कुणाला काही कळणार नाही असच वाटत राहते ... पण लपवल्याने प्रश्न अनुत्तरीत राहण्याची भीती जास्त ! जखमेची खपली न काढता कितीही औषध लावलं तरी जखम बरी थोडीच होणार आहे ,जखम बरी होण्यासाठी खपलीखालची ठसठसणारी घाण निघणे गरजेचे ! आईनेच हे कधीतरी सांगितलं होतं ! मी लगेच उठलो नि बापुना फोन केला .
''बापू, मी बोलतोय, विकास''
''अरे हा बोल विकास, अरे हो तुला सांगायचं राहील ,अरे तुझ्या दादाने दुसरीच मुलगी पहिली आहे म्हणून तो लग्नाला नकार देत होता , सकाळीच आईला सर्व सांगितलं त्याने आणि फोटोहि दाखवला मुलीचा, सुरेख आहे मुलगी आणि शिकलेली सुद्धा , तीन वर्षापासून चाललय पण दादाने मागमूस लागू दिला नाही ,आईला आणि मला वाईट वाटल ...एव्हडे मैत्रीचे संबंध ठेऊन मुलांना आपण जवळचे वाटत नाही म्हणून ...पण जाऊ दे त्याचा आनंद तोच माझाही म्हणजे आपला सर्वांचा रे , तुला फोन करणार होतो पण म्हटल तू कॉलेजांत असशील ...बर तू का फोन केलास? ''
''.....''
''सांग न विकास , काय झालं ?''
'' काही नाही बापू , तुम्ही नकार कळवला ?''
''नाही , म्हटल प्रत्यक्ष जाऊन सर्व सांगाव नि झाल्या गोष्टीबद्दल माफी मागावी ''
''तुम्ही जायच्या आधी माझ्याकडे याल का ?''
''हो येईल बाळा, काही काळजीच नाही ना?''
''नाही बापू ,आल्यावर बोलेन मी ''
''ठेऊ मग ''
''हो ,आणि होस्टेलमध्ये या ''
''बर बर ''
फोन ठेवला पण डोक्यावरच भलमोठ ओझं कमी झाल्यासारख भासल ,पण आता पुढच्या मोठ्या परीक्षेची तयारी करायची होती ती म्हणजे बापूंना सर्वकाही खर सांगण्याची .....
आजची सकाळ पावसात धुवून निघालेल्या झाडासारखी स्वच्छ, मोकळी वाटत होती . एक वेगळाच विश्वास मन भरून उरला होता ...मी आजची परीक्षा नक्की पास होणार ....कदाचित माझ्या अर्ध्या बोलण्याने बापू झोपू शकले नसावेत म्हणून लवकर उठून आठ वाजता होस्टेलच्या वेटिंगररूम मध्ये आल्याचे निरोप माळीकाकाने आणला. सर्व आवरून मी खाली गेलो ,बापू वाटच पाहत होते .
''चला बागेत बसू ''
''बोल विकास ,काय झालं आता रात्रभर मी आणि तुझी आई झोपलो नाही, काही आजारी नाहीस ना ? का कुणी त्रास देत तुला? परीक्षेच टेन्शन अजिबात घेऊ नकोस , एक ऐवजी दोन वर्ष लागू दे मी आहे ना , पण मुलांनी सुखी असाव एव्हडच वाटत रे , बोलं रे बोल आणखी उत्कंठा नको लावूस.''
'' नाही बापू माझी काही काळजी करू नका, आणि कॉलेजच म्हणाल तर मी नक्की चांगल्या मार्कांनी पास होणार आहे, पण आज मला काही मागायचं आहे ,आणि हो तुम्हीही तुम्हाला आवडल तर होकार द्या.''
''....बापू मला आपण पाहायला गेलेलो ना ती मुलगी आवडते ,दोन वर्षापासून मी तिच्यावर प्रेम करतो पण तिला काय कुणालाच सांगण्याच धाडस मला झालं नाही ,त्या दिवशी दादाची नवरी म्हणून तिला पाहिलं नि मी गळूनच गेलो , पण नन्तर कुणाला न सांगता मनात ठेवण्याचा निर्णय घेतला पण दादाचा नकार समजल्यावर पुन्हा अस्वस्थ झालो नि विचार करून करून शेवटी तुम्हाला सांगण्याच ठरवल कारण तुम्हीच सांगता ना विचारल्याशिवाय प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत म्हणून ! बापू नकार सांगण्यापेक्षा तुमच्या लहान मुलासाठी मागणी नाही घालू शकत तुम्ही ! प्लीज बापू , हीच वेळ आहे तिला सांगण्याची कारण मी तिच्या समोर गेलो कि माझी वाचाच बंद होते ! तुम्ही माझे वडील तर आहात पण माझे मित्रही आहात ,तुम्हीच मला या संभ्रमातून बाहेर काढू शकता ! कराल ना बापू एव्हड ,प्लीज मला समजून घ्याल ना ?''
बापू उठले नि मला कडकडून मिठी मारली ,नि डोळ्याच पाणी पुसत म्हणाले ,'' मलाही ती मुलगी सून म्हणून आवडली होती रे, पण तुला कुठल्या तोंडाने विचारावे हेच कळत नव्हत , वाटल तु काही वेगळा विचार तर करणार नाहीस, पण त्या विधात्यालाच काळजी रे सगळ्याची! माझ्या मनातल बोललास बाळा ,मनातल बोललास! आत्ता जातो नि त्यांना सांगून येतो .''
मी गपकन वाकलो नि बापूंचे पाय धरले , त्यांनी परत मला उराशी कवटाळल . परत यायला उशीर झाल्याने , फोन करूनच बापुंनि त्यानीही हि गोष्ट आनंदाने स्वीकारल्याच सांगितल .....
आज आवरून कॉलेजच्या गेटमध्ये बसलो, ती येण्याच्या दोन तास आधी ! ती ...आली....एक हसरा कटाक्ष ....मी घायाळ ..........ती लाजली नि क्लास पर्यंत जाईपर्यंत खाली घातलेली मान वर केली नाही ! विलास ,सुहास सर्वजण प्रश्नार्थक नजरेने माझ्याकडे पाहत होते ,पण मी मात्र ..............................................
''अरे काही नाही उद्या बापू आणि दादा येणार आहेत दादाला मुलगी पाहायला आम्ही जाणार आहोत.''
'' तू असा काही वागतो आहेस कि मला वाटल तुलाच मुलगी पाहायची आहे!''
'' नाही रे, आमच्या चौघांच्या घरात हे नवीन माणूस म्हणजे थोडी उस्तुकता असणारच ना ? त्यात मला बहिण नाही, म्हणून रे बाकी काही नाही!''
सगळ्यांच्या आधी उठून चहा, नाश्ता उरकून बसलो. बाल्कनीत येऊन बापू आणि दादाची वाट पाहत होतो. समोरच्या मोकळ्या मैदानात होस्टेलची मुलं क्रिकेट खेळत होती .
सुहास मला हाक मारत होता ''चल ना विकास''
''नको रे सुहास त्याची इस्री मोडेल कपड्यांची, आज वहिनी पाहायची आहे आम्हाला'' माझ्या आधी विलास उत्तरला. सगळे हसत निघून गेले . त्यांचा खेळ मी बाल्कनीतून बघत होतो..
''विकास ,ये विकास आवरल का रे ''बापूंची हाक. मी वाकून बघितलं तर दोघेही आले होते मी धावत खाली गेलो दादाच्या मस्करीचा एकही चान्स मला सोडायचा नव्हता. गेल्या गेल्या दादाला मिठी मारली,''काय मग नवरदेव, चला लवकर वहिनी वाट पाहत असतील'' थोडसं हसून दादाने स्वताची सोडवणूक केली नि उत्तर न देता गाडीत जावून बसला. तो अबोल आहे पहिल्यापासून पण असं.....जाऊ दे न हा कदाचित लाजत असेल आणि आहे त्याचा स्वभाव नको त्या गोष्टीच ओझं मानगुटीवर घेऊन रडत बसण्याचा ... पण आज मात्र मी फुल मूडमध्ये होतो ... आज बापू नि आई कुणाच मी ऐकणार नव्हतो. माझी बडबड ऐकून बापू मनापासून दाद देत होते ...शेवटी त्यानीही हि वेळ आतुरतेने इच्छिली होतीच कि ...एक तास पूर्ण प्रवासात मी दादाची मस्करी करण्यात इतका दंग होतो कि त्याच्या काय भावना आहेत, काय स्वप्न आहेत हेही जाणून घ्यावं हे भान उरलं नाही. माणूस स्वानंदात इतका बुडून जातो कि समोरचं माणूस खरोखर आपल्या सुखात समाधानी आहे कि नाही याचा त्याला विचारही करावासा वाटत नाही मग तो तुमचा कुणीही असो...मी याला अपवाद कसा असेल!
आम्ही तिथे पोहचताच जंगी स्वागत झालं. हळूच दादाला कोपर मारला नि कुजबुजलो,''स्वागत जावईबापू!''
बैठकीची खोली नीटनेटकी सजवलेली, गर्भश्रीमंती प्रत्येक वस्तू पाहून लक्षात येत होती . चहापान झालं . मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम सुरु झाला . मुलीचा भाऊ तिला घेऊन बैठकीत येत होता सर्वांच लक्ष्य तिकडे नि मी दादाला कोपरखळ्या मारण्यात गर्क! मुलगी समोर येऊन बसत होती तो मी तिला पाहिलं नि हातभर वर उडालो...जो चेहरा मी गेली दोन वर्ष मनाच्या कोंदणात ठेऊन पूजत होतो नि माझ्या वहीत फक्त तिच्याच सौंदर्याच्या वर्णनाने पानेच पाने भरली होती, जी माझ्या हृदयातील मंदिरात स्थानापन्न झालेली देवता होती, जिच्यासाठी मी सर्वकाही विसरून तासन तास तिच्या फक्त एका दर्शनासाठी कॉलेजच्या गेटमध्ये बसून असायचो ती माझी स्वप्नपरी,माझी प्रिया, माझी ह्रिदयचोर कोमल होती.... माझ्या मनाच्या या देवतेला या क्षुद्र जीवाबद्दल काहीच माहित नव्हत मी आपला एकतर्फी प्रेमात आकंठ बुडालेला एक प्रेमवीर होतो ज्याचं प्रेम त्याच्या मनाच्या नि वहीच्या बाहेर कधी आलच नव्हतं...पण आज असं काही समोर उभं राहील हे माझ्या कधी स्वप्नीही नव्हतं! रात्रीपासून हवेत उडणारा मी धाडकन जमिनीवर आदळलो होतो .... अशा ब्रह्मसंकटात सापडलो होतो कि ....अचानक आलेल्या वळीवाने बहरलेला गुलमोहर लुटून नेला .......................मी मात्र न वर्णिता येईल अशा संभ्रमात अडकलो होतो.............त्यानंतर काय झालं, मी कसा घरी आलो ,दादा काय बोलला हे आठवत नाही. मी एका अशा अवस्थेत होतो कि दुसऱ्या दिवशी जरासा भानावर आलो .तोपर्यंत हे काय झालं , दादाऐवजी दुसरा कुणी असता तर भांडून,विनंती करून कसही मी तिला मिळवलच असतं पण जर दादाने होकार दिला तर? का देईल तो नकार? इतकी सुंदर, सालस मुलगी तो नको म्हणणार नाही ,आणि ती जर वहिनी म्हणून घरात आली तर मी स्वतःला संभाळू शकेल का ? बर झालं मी कुणालाही माझी हि प्रेमकहाणी सांगितली नाही. कमीत कमी मी एकटाच सहन करणारा असणार आहे..... हो पण आता माझ्या आयुष्यातील लग्न हि गोष्ट मी काढून टाकणार! तिच्याशिवाय दुसरी कुणी ....नाही विचारही मनात आणू शकत नाही ! काय करू ...माझ्या मनाची हि अवस्था कुणाला सांगू ! आईला ...नको ,कि बापूंना ...,कि विलासला ...नको बाहेरच्या माणसाला नको ..काय करू ...अस वाटत होतं डोक्याचे सगळे केस उपटून काढावेत ,भिंतीवर डोक आपटाव कि ....
दिवसभर कॉलेजला गेलो नाही ,न जेवता तसाच पांघरुन घेऊन झोपून राहिलो . मित्रांनी कमेंट केल्या पण त्या समजण्याच्या पलीकडे मी गेलो होतो,शेवटी तीही कंटाळून कॉलेजला गेली. चारच्या दरम्यान बापूंचा फोन आला, त्यांनी जे सांगितलं त्याने मला काय कराव काही कळत नव्हत. दादा नाही म्हणत होता लग्न करायला, बापू सांगत होते त्याला समजाव म्हणून! आता मी कस समजावणार होतो देव जाणे ! दादा इतक्या सुंदर मुलीला का नाही म्हणत असेल? मी काल येताना काही बरळलो तर नाही? तसं बापूनी सांगितलं असत मला, काय झालं दादाला, कुणी दुसरी? त्याने मला सांगितलं असतं, कदाचित लाजला असेल, पण आईला नक्की सांगितलं असतं ...मला आनंद होत होता पण वाईटहि वाटत होत तिला नकार कळल्यावर ती आमचा सर्वांचा तिरस्कार तर करणार नाही? एक ना अनेक शंका माझं मन पोखरत होत्या.
दुसऱ्या दिवशी कॉलेजच्या गेटमध्ये थांबायचं धाडस झालं नाही पण म्हणतात ना भित्यापाठी ब्रह्मराक्षस तसं ती माझ्या समोर आलीच! पण ती हवीशी वाटणारी एक रमणी होती , माझी? कोमल होती. पर्वाची ओळख लक्षात ठेऊन तिने एक हसरा कटाक्ष माझ्याकडे टाकला ,माझ्या शरीरात एक गोड ,हवीशी वाटणारी वेदना सरसरून अंगभर पसरली , क्षणभर कोमल मोरपीस चेहऱ्यावर फिरतोय असं भासलं ! भानावर आलो तर तिथ कुणीच नव्हत..मनाचं हे सुख क्षणभर राहील! वाटल तिला उद्या नकार कळला तर काय होईल ? देवाला माझी दया कधी येईल का ? तसाच परत होस्टेलला आलो . आपण कितीही अस्वथ असलो तरी जगापासून मनाची हि होरपळ लपवाविशीच वाटते, डोक्यावर पांघरून घेतलं कि कुणाला काही कळणार नाही असच वाटत राहते ... पण लपवल्याने प्रश्न अनुत्तरीत राहण्याची भीती जास्त ! जखमेची खपली न काढता कितीही औषध लावलं तरी जखम बरी थोडीच होणार आहे ,जखम बरी होण्यासाठी खपलीखालची ठसठसणारी घाण निघणे गरजेचे ! आईनेच हे कधीतरी सांगितलं होतं ! मी लगेच उठलो नि बापुना फोन केला .
''बापू, मी बोलतोय, विकास''
''अरे हा बोल विकास, अरे हो तुला सांगायचं राहील ,अरे तुझ्या दादाने दुसरीच मुलगी पहिली आहे म्हणून तो लग्नाला नकार देत होता , सकाळीच आईला सर्व सांगितलं त्याने आणि फोटोहि दाखवला मुलीचा, सुरेख आहे मुलगी आणि शिकलेली सुद्धा , तीन वर्षापासून चाललय पण दादाने मागमूस लागू दिला नाही ,आईला आणि मला वाईट वाटल ...एव्हडे मैत्रीचे संबंध ठेऊन मुलांना आपण जवळचे वाटत नाही म्हणून ...पण जाऊ दे त्याचा आनंद तोच माझाही म्हणजे आपला सर्वांचा रे , तुला फोन करणार होतो पण म्हटल तू कॉलेजांत असशील ...बर तू का फोन केलास? ''
''.....''
''सांग न विकास , काय झालं ?''
'' काही नाही बापू , तुम्ही नकार कळवला ?''
''नाही , म्हटल प्रत्यक्ष जाऊन सर्व सांगाव नि झाल्या गोष्टीबद्दल माफी मागावी ''
''तुम्ही जायच्या आधी माझ्याकडे याल का ?''
''हो येईल बाळा, काही काळजीच नाही ना?''
''नाही बापू ,आल्यावर बोलेन मी ''
''ठेऊ मग ''
''हो ,आणि होस्टेलमध्ये या ''
''बर बर ''
फोन ठेवला पण डोक्यावरच भलमोठ ओझं कमी झाल्यासारख भासल ,पण आता पुढच्या मोठ्या परीक्षेची तयारी करायची होती ती म्हणजे बापूंना सर्वकाही खर सांगण्याची .....
आजची सकाळ पावसात धुवून निघालेल्या झाडासारखी स्वच्छ, मोकळी वाटत होती . एक वेगळाच विश्वास मन भरून उरला होता ...मी आजची परीक्षा नक्की पास होणार ....कदाचित माझ्या अर्ध्या बोलण्याने बापू झोपू शकले नसावेत म्हणून लवकर उठून आठ वाजता होस्टेलच्या वेटिंगररूम मध्ये आल्याचे निरोप माळीकाकाने आणला. सर्व आवरून मी खाली गेलो ,बापू वाटच पाहत होते .
''चला बागेत बसू ''
''बोल विकास ,काय झालं आता रात्रभर मी आणि तुझी आई झोपलो नाही, काही आजारी नाहीस ना ? का कुणी त्रास देत तुला? परीक्षेच टेन्शन अजिबात घेऊ नकोस , एक ऐवजी दोन वर्ष लागू दे मी आहे ना , पण मुलांनी सुखी असाव एव्हडच वाटत रे , बोलं रे बोल आणखी उत्कंठा नको लावूस.''
'' नाही बापू माझी काही काळजी करू नका, आणि कॉलेजच म्हणाल तर मी नक्की चांगल्या मार्कांनी पास होणार आहे, पण आज मला काही मागायचं आहे ,आणि हो तुम्हीही तुम्हाला आवडल तर होकार द्या.''
''....बापू मला आपण पाहायला गेलेलो ना ती मुलगी आवडते ,दोन वर्षापासून मी तिच्यावर प्रेम करतो पण तिला काय कुणालाच सांगण्याच धाडस मला झालं नाही ,त्या दिवशी दादाची नवरी म्हणून तिला पाहिलं नि मी गळूनच गेलो , पण नन्तर कुणाला न सांगता मनात ठेवण्याचा निर्णय घेतला पण दादाचा नकार समजल्यावर पुन्हा अस्वस्थ झालो नि विचार करून करून शेवटी तुम्हाला सांगण्याच ठरवल कारण तुम्हीच सांगता ना विचारल्याशिवाय प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत म्हणून ! बापू नकार सांगण्यापेक्षा तुमच्या लहान मुलासाठी मागणी नाही घालू शकत तुम्ही ! प्लीज बापू , हीच वेळ आहे तिला सांगण्याची कारण मी तिच्या समोर गेलो कि माझी वाचाच बंद होते ! तुम्ही माझे वडील तर आहात पण माझे मित्रही आहात ,तुम्हीच मला या संभ्रमातून बाहेर काढू शकता ! कराल ना बापू एव्हड ,प्लीज मला समजून घ्याल ना ?''
बापू उठले नि मला कडकडून मिठी मारली ,नि डोळ्याच पाणी पुसत म्हणाले ,'' मलाही ती मुलगी सून म्हणून आवडली होती रे, पण तुला कुठल्या तोंडाने विचारावे हेच कळत नव्हत , वाटल तु काही वेगळा विचार तर करणार नाहीस, पण त्या विधात्यालाच काळजी रे सगळ्याची! माझ्या मनातल बोललास बाळा ,मनातल बोललास! आत्ता जातो नि त्यांना सांगून येतो .''
मी गपकन वाकलो नि बापूंचे पाय धरले , त्यांनी परत मला उराशी कवटाळल . परत यायला उशीर झाल्याने , फोन करूनच बापुंनि त्यानीही हि गोष्ट आनंदाने स्वीकारल्याच सांगितल .....
आज आवरून कॉलेजच्या गेटमध्ये बसलो, ती येण्याच्या दोन तास आधी ! ती ...आली....एक हसरा कटाक्ष ....मी घायाळ ..........ती लाजली नि क्लास पर्यंत जाईपर्यंत खाली घातलेली मान वर केली नाही ! विलास ,सुहास सर्वजण प्रश्नार्थक नजरेने माझ्याकडे पाहत होते ,पण मी मात्र ..............................................
Monday, 26 September 2011
आण्णांच्या आंदोलनाने मला काय दिले?
''मम्मी , ए मम्मी मला न स्केल घ्यायची आहे पैसे दे न दादाजवळ.'' उठल्यापासून सत्योमच एकच मागण चालल होत. मी मात्र त्या दोघांचे आणि सारिका आत्याचा डबा करण्याच्या घाईत होते. ते झाल नि डबे , बाटल्या भरून सत्योमला अंघोळ घालायला गेले. परत त्याची भुणभुण चालू झाली. खर तर दादा सांगत होता पहिलीत स्केल लागत नाही, उगाच हि मुल मारामाऱ्या करतात, म्हणून मी दुर्लक्ष्य करत होते पण तो काही केल्या मागणी मागे घेत नव्हता. शेवटी मी शेवटच अस्र बाहेर काढल हात वरचा खाली येईपर्यंत बाळ कडाडला,''बघ आ मम्मे मी उपोषण करीन!'' मला हसाव कि रडावं हेच कळेना. दादाला पैसे दिले नि छोटी स्केल घ्यायला सांगितली.
नेहमी स्वताच्या मागण्या रडून, आदळ आपट करून मान्य करून घ्यायचा प्रसंगी तोड फोड करायची वेळ आली तरी करायचा. पण आजचा हा अवतार बघून मी निशब्द झाले. आण्णांच आंदोलन जेव्हापासून चालू होत तेव्हापासून आमचा news chanal बंद नव्हता. त्यात आमची चर्चाही तो ऐकत असे. मुलांच्या मनात घर करून बसलेल्या या गोष्टी अचानक अश्या पुढे येतात कि आपण निरुत्तर होऊन जातो.

आण्णांच्या आंदोलनाने देशाला काय दिल यापेक्षा तरुणांना, उगवत्या पिढीला एक नवी दिशा दिली. ती अशी कि फक्त हिंसाचाराने प्रश्न सुटत नाहीत तर ते वाढत जातात अनेकदा मनुष्यहानी, वित्तहानीहि होते, देशाच तसच आंदोलनकर्त्याचहि न भरून येणार नुकसान होत. या उलट अहिंसेच्या मार्गाने जरी काही मिळाल नाही तरी काही हानी तर होत नाही. गांधीजींनी दाखवलेला हा अहिंसेचा मार्ग आपण जरी विसरलो होतो तरी आण्णांनी तो परत दाखउन दिला आहे,आणि यशस्वी झालेला सर्व जगाने पाहिला आहे. म्हणून आण्णांनचे शतश: आभार !
Sunday, 25 September 2011
वयनीमाय
हवेतला गारवा उगाचच अंगाला झोंबत होता. न्याहारीची वेळ झाली तरी उन वर यायचं नाव घेत नव्हत. पण शेवन्ताच्या अंगणाला आज निराळाच रंग होता. तसं पहिल तर अंगण घराच्या आतल वातावरण कस आहे याचच प्रतिबिंब! स्वच्छ सारवलेला ओटा, उजव्या हाताला छपरात दोन गाया एक वासरू टाकलेली मक्याची कुटी चघळत होती. घासाच ओझ ओट्याजवळच्या बदामाच्या झाडाखाली पडलेल. शेवंता घरातलं काम उरकून बाहेर गुरांना पाणी ठेवायला आली. गायांच्या पुढ बादली ठेऊन ती जरा झाडाच्या सावलीत ओट्यावर टेकली. मागच्या आठ दिवसाची तगमग आता कुठ शांत होती. मनाच्या पाखराला सदान चांगलीच येसण घातली, ती पण प्रेमाने समजावून! आणि विशेष म्हणजे थोडाही धाक न दाखवता. सदाची हीच सामंजस्याची भाषा, प्रेमाचे शब्द शेवंता आणि त्याला आता पर्यंत एकमेकांशी घट्ट बांधून आहेत. नवरा बायकोच नातं असच जितक लांब ढकलू तेवढ जोरात परत एकमेकांजवळ ओढून आणत. पृथ्वी जस सूर्याभोवती गुरुत्व-आकर्षानामुळ फिरत राहते तस! एक अशीच ओढ यांनाही बांधून होती.
मोटर चालू होती म्हणून शेवंता आज विहिरीवर कपडे धुवायला गेलेली. शेजारची ताईबाई संग होतीच. त्यांच्या दोघींमधी शेजारणी असून कधी भांडण नव्हती, एकमेकीची मदतच करायच्या! हौदाच्या कडांवर मोठाल दगड असल्यान कपडे धुवायला सोप जायचं. वीजमंडळाच्या कृपेची फक्त गरज असायची!
'' शेवन्ते परभू लई दिस झाल आला नाय ग.''
'' ताई, मास्तर हाय त्यो, सवड तर पायजेन, त्यामधी माधुरीची बी शाळा असतीया, एक दिस सुटी असली तरी आठ दिसाचा राडा आवरायला अख्खा दिस संपतो. लागून सुट्या आल्या कि येत्यानच कि !''
''बघ शेवन्ते, तुमी पाठच्या दीर ,नंदला मोठ करायच म्हनुनशान पोटपाणी पिकू दिल न्हाय! म्हातारपणी ह्यांनी सांभाळ केला तर ठीक न्हायतर अवघड होऊन जायचं!''
''न्हाय ताई, माजी पोर तशी न्हायत ,ती कावा बी अंतर नाय देयची.''
''परभू हाय तुजा पर माधुरी हाय का ?''
''नाय ग ताई गुणी पोर हाय ती बी .''
''चांगल हाय पर तू आपली जपून आस . काय कुणाचा भरवसा नाय बग कुणाची मती कवा बदलल सांगण अवगड हाय, चल येते मी झाल माज .''
ताईबाई गेली पण शेवन्ताच डोक मात्र बधीर झाल. संशयाची ठिणगी एकदा पडली कि वनवा पेटवल्याशिवाय गप्प होत नाही. एकदा का वनवा पेटला कि घरच्या घर उध्वस्त झालीच म्हणून समजा. कळत असूनही संशयाच्या या वारूला कुणी लगाम घालू इच्छित नाही हि सगळ्यात मोठी शोकांतिका! मग या संशयाने अगदी आई मुलाच्या नात्याचा बळी घेतला तरी यांना चालतो. आणि या विखारी रोपाला खत पाणी घालायला बाकीचे टपलेले असतातच. माणूस क्षणाच नात वर्षानुवर्षे जपलेल्या नात्याला गिळंकृत करताना पाहूच कसा शकतो? शेवंता मात्र गलबलून गेली होती. जेवानावरच मन उडून गेल होत. सदा येई पर्यंत तिचा जीव शांत होणार न्हवता. कारण त्याने लग्नाआधी नसबंदी केली नसती तर एखाद पोर मला बी झाल असत माझा खरा गुन्हेगार तोच आहे. शेवन्ताच अंग थरथर कापत होत. सदा आल्यावर त्याला किती दोष देऊ नि किती नको अस तिला झाल होत. हातान या माणसान आपल्या आयुष्याच वाटोळ करून घेतलय आता म्हातारपणी कुणाच्या तोंडाकड बघायचं? एक न अनेक शंका तिला घायाळ करत होत्या. दु:खाची नुसती चाहूल माणसाला हतबल का बनवत असेल? ते होणार कि नाही हेही त्यांना माहित नसत, पण मरण यायच्या आधीच खड्डा घेण्याची सवयच बनून गेली आहे. उद्याच्या दु:खाच्या चाहुलीने आपण आपल आज संपवतो आहे हेही यांना का कळत नाही देवच जाणो?
सदा आला पण शेवंता एक शब्दहि का बोलत नाही याचा काही अंदाज त्याला येईना. थोडा गोडीन तिच्याजवळ गेला पण तीन असा काही त्याला झिडकारला कि त्याच डोकच बधीर झाल. जाताना तर सगळ ठीकठाक होत मग अस अचानक दोन तासात काय घडल? आता काय करायचं? ओरडल तर परस्थिती आणखी बिघडणार थोड कुरवाळच पाहिजे हे त्याने उमजून घेतलं.
''शेवन्ते काय न सांगता तू आजूक माजा किती जीव जाळणार हैस? सांगती का जाऊ लांब कुठतरी? परत त्वांड नाय दाखीव्णार तुला.''
आता मात्र जीव्हारी बाण लागला. शेवंती ढसाढसा रडायला लागली त्याच्या गळ्यात पडून आणि विहिरीवर झालेली हकीगत सांगितली. सदा लागला हसायला. ''हे तुज ना शेवन्ते उद्याच्याला जेवण मिळल का नाय ह्या विचारांनी आजच उपाशी राहण्यासारक झाल! तुला ग कश्याला काळजी पायजे याची. मी हाय ना कुणी नसाल तरी, आन समजा तू आजच मरून गेल्यावर?'' सदा परत मोठ्यान हसायला लागला. शेवंती मात्र जास्तच भडकली,''माज डोक तळ्याव नाय आन तुमालाव कश्याची मस्करी सुचती ? जावा तीकड नका बोलू माज्यासंगत.'' सदान तिला जवळ घेत तिला समजावल.
''शेवन्ते आग कुत्र्याच्या पिलाला जीव लावला त ते बी आपल्या माग पळत! ह्यो तर माजा पाठचा भाऊ हाय. आणि मला सांग तू बी पोटच्या पोरापरीस जास्तच जीव लावला नव्ह परभुला मंग तुज्या संस्काराव तुज इस्वास का त्या ताय्बायवर सांग बर मला? आन माधुरी बद्दल बी तू शंका कशी घेऊ शकती तीन बी तुजी किती सेवा केली बर तू आजारी होती तवा! लोकाची असली तरी चार बुक शिकल्याली समंजस पोर हाय ती ! आशी उगाच डोक्यात राख कश्यापरीस घालती, येवड सांगून तुला पटत नसल चल चार दिस त्येन्च्यासंग राहून तू अनुभव घेऊन बग मंग तर झाल. उरिक लवकर आजच या शंकला चुलीत घालू .''
शेवंता लगबगीने उठली, परभूकड जायचं म्हणून ती गरबडीने मळ्यात जाऊन मिरच्या, वांगी, शेपू-चुक्याची भाजी, पेरू ,आन बरच काही घेऊन आली. दोनच्या गाडीने दोघ पर्भूकड रवाना झाली. पोहचायला पाच वाजले. माधुरी नुकतीच आली होती. दादा नि वयनीमायला बघून तिला तिचा आनंद लपवता येन अवघड होऊन बसल, आत येताच ती दादाच्या पाया पडली आणि वयनीला जाऊन बिलगली, लई दिवसांनी आई दिसल्यावर जस लेकरू बिलगत तशी! सदा शेवन्तिकड बघत होता, नजरानजर होताच शेवंती वरमली. त्यांना चहा पाणी देऊन माधुरी स्वय्पाकाला लागली, शेवंता लुडबुड करू लागली पण माधुरीन तिला हाताला धरून बाजूला बसवल. तासाभरात परभू आला त्याला अचानक आलेले दादा, वयनीमाय बघून इतका आनंद झाला कि दोघांना कुठे ठेऊ कुठे नको अस झाल . त्याचं ते प्रेम बघून शेवंता मात्र आतल्या आत खजील होत होती. तिला धरणी माय ठाव दे अस झाल तिची चुलबुल बघून सदा मनातल्या मनात हसत होता पण त्याला ते लपवता येत नव्हत. जेवण आटोपल्यावर ती माधुरी जवळ बोललीच,''तुला कधी अस वाटल नाय आपल्या नवऱ्याची दादा वयनी आपण कश्यापरीस त्येंच करायचं .''
''वयनीमाय, तुमाला जर तवा वाटल असत तर मला आता तस वाटल असत. ज्या मावलीने बारीक दीर,नणंद सांभाळण्यासाठी आपल् पोट पाणी पिकू दिल नाही त्या माउलीची अशी अवहेलना केली तर प्रत्यक्ष परमेश्वर सुद्धा माझी पाप धुऊ शकणार नाही !''
''बस बस माधुरी, तुला हे सांगितलं कुणी?''
''तुमच्या लाडक्या पर्भून! आणि हो लग्नाआधीच कबुल करून घेतल कि माझ्या दादाला आणि वयनीमायला अंतर द्यायचं नाही! या अटीवर तर यांनी लग्न केल माझ्याबरोबर!''
आज शेवन्ताला जन्मच सार्थक झाल अस वाटायला लागल. सगळ भरून पावलो आता देवाकड काही मागण नाही! माणूस सुख शोधत उर फुटेपर्यंत धावतो पण त्याच्याजवळ लपलेल सुख त्याला दिसत नाही त्या कस्तुरी मृगसारख!
शेवंतान सगळ सदाला सांगितलं! तिचे डोळे तिच्या नकळत वाहत होते पण आनंदाने !
''पण परभू सारख तुमी लगणा आधी मला इस्स्वसात घेतलं असत त जमल नसत का ?'' लाडिक गुश्यात शेवंता बोलली.
''तवा आजाच्यासारक लग्नाआगुदार भेटली आसती तर सांगितलं आसत कि!'' मिस्कीलपने सदा बोलला. लाजत शेवंती त्येच्या कुशीत शिरली. ति आता निश्चिंत झाली!
बदामच्या झाडाखाली बसून एक निश्चय शेवन्ताने आज केला,'' परत आसा येडेपणा नाय करायचा, माज्या पर्भूबद्दल शंका म्हंजी देवाबद्दल शंका!''
Subscribe to:
Posts (Atom)