माझे तुपण
अन तुझे मीपण
खरेच सांग
वेगळे आहोत का आपण
रुतला काटा जरी
वेदना तुझ्या उरी
माझ्यासाठी जगते
मरते कितीदा तरी.
पाठ फिरवली तरी
ठेवून आशा न्यारी
तेवत ठेवली ज्योत
दुःखाच्या वादळवारी
आला सांजवारा
वारला दु:खाचा पसारा
माझ्यासाठी जगलीस
हाती घेवून निखारा
कळले मला प्रेम तुझे
तुझ्यासाठी झुरले मनहि माझे
खर सांगतो एकच स्वप्न पहिले
असावे छान घरटे तुझे नि माझे
म्हणून तुला विचारतो
माझे तुपण
अन तुझे मी पण
खरेच सांग
वेगळे आहोत आपण?
अन तुझे मीपण
खरेच सांग
वेगळे आहोत का आपण
रुतला काटा जरी
वेदना तुझ्या उरी
माझ्यासाठी जगते
मरते कितीदा तरी.
पाठ फिरवली तरी
ठेवून आशा न्यारी
तेवत ठेवली ज्योत
दुःखाच्या वादळवारी
आला सांजवारा
वारला दु:खाचा पसारा
माझ्यासाठी जगलीस
हाती घेवून निखारा
कळले मला प्रेम तुझे
तुझ्यासाठी झुरले मनहि माझे
खर सांगतो एकच स्वप्न पहिले
असावे छान घरटे तुझे नि माझे
म्हणून तुला विचारतो
माझे तुपण
अन तुझे मी पण
खरेच सांग
वेगळे आहोत आपण?
4 comments:
सुंदर कविता ..आवड्ली.
thanx!
आतापर्यंतची आपली सर्वात सुंदर कविता.
धन्यवाद !
Post a Comment