या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

Friday 30 March 2012

एक झाड

एक झाड त्या तिथे
उजाड माळरानाच्या
एका कोपर्यात ...

अनेक वर्ष वाट
पाहत असेल कुणाची
होत असेल का होरपळ
त्याच्याही मनाची

प्रत्येक ऋतूने आपली
ओळख त्याला देऊ केली
त्यानेहि मग ती स्वताची
म्हणून जगाला दाखवली

येणारा प्रत्येक जीव
सावलीत त्याच्या रमला
त्याच्याच जीवाचा आनंद
त्यांच्या सुखात पहिला

कोलाहलापासून जगाच्या
दूर आहे त्याचे विश्व जरी
निवांत आहे भोवताल, मेघांचा
गडगडाट भरला खोल उरी

अर्धे आयुष्य सरले
अर्धे अजून आहे बाकी
प्रश्न त्याला पडला आहे
मिळेल कुणी सहप्रवाशी
शेवटपर्यंत ....

एक झाड त्या तिथे
उजाड माळरानाच्या
एका कोपर्यात ...

2 comments:

Anonymous said...

this isnt useful

Unknown said...

धन्यवाद अनोनिमस , ब्लॉगवर भेट दिल्याबद्दल !
हे दु:ख आहे अश्या बायकांचे ज्यांचे आयुष्य असेच संपते , दुसर्यासोबत जगत. आपल्या अवतीभवती अश्या अनेक बायका असतात . कुणी परित्यक्ता , कुणी विधवा , कुणी प्रौढ कुमारिका ! त्यांचे जीवन असेच संपते , इतरांचे संसार पाहत ! स्वताचा करायचे भाग्याच लाभात नाही ! कधी या घरी तर कधी त्या घरी , त्या त्या घराप्रमाणे त्या राहतात पण शेवट असाच अधांतरी लटकत राहणे हाच असतो . खरे तर या बायांची वेदना मी मांडण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी ठरला ! पण तुमच्या प्रतिक्रिया खरच गरजेच्या आहेत , मी नवीन लिहायला लागले आहे म्हणून मी लिहिलेल्या भावना वाचकांना कळणे गरजेचे आहे आणि तुम्ही सांगितले तर मला कळेल कि अजून चांगले केले पाहिजे !
धन्यवाद असेच सांगत रहा , चांगले तर सर्वांना आवडते पण चुका सांगतल्या तर सुधारणा करता येते ! धन्यवाद !